Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनामहाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाउन कायम?

महाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाउन कायम?


मुंबई (रिपोर्टर):- करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लावण्यात आला आहे. ठाकरे सरकारने 1 जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. एकीकडे राज्य करोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना सरकारसमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता असून लॉकडाउन वाढणार की उठवणार हे पाहावं लागेल. राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असणार आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, लॉकडाउन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालयं, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असं विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे.

Most Popular

error: Content is protected !!