Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनामोक्कार फिरणार्‍या १४५ जणांवर पोलीसांनी केली कारवाई

मोक्कार फिरणार्‍या १४५ जणांवर पोलीसांनी केली कारवाई


बीड (रिपोर्टर)ः- कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी कडक निर्बध लावण्यात आलेले आहे. असे असतांना काही जण विनाकारण रस्त्याने फिरतात. अशा सडक फिर्‍या विरोधात कारवाई केली जात आहे. आज दुपारपर्यंत १४५ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्याचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बध लावलेले आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. बीड शहरातल्या विविध भागात पोलीसांनी नाकाबंदी करत त्याठिकाणी वाहन धारकांची चौकशी सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर आज सकाळपासून पोलीसांनी वाहन धारकांची कसून तपासणी केली. यावेळी एपीआय शेख यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. दुपारपर्यंत १४५ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

Most Popular

error: Content is protected !!