Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडधारूरनायब तहसिलदार हातात काठी घेवून उतरले रस्त्यावर ,पोलीस कर्मचार्‍यांवर नगर पालिका, महसुल...

नायब तहसिलदार हातात काठी घेवून उतरले रस्त्यावर ,पोलीस कर्मचार्‍यांवर नगर पालिका, महसुल विभागाकडून कारवाया

केज (रिपोर्टर)ः- ीड जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत कडक निर्बध लावण्यात आलेले आहे. असे असतांना नियमाचा उल्लंघन करणार्‍या लोकाविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. महसुल विभागाच्या वतीने नाय तहसिलदार देशपांडे हे आज हातात काठी घेवून रस्त्यावर उतरले होते. नागरीकांनी नियमाचं पालन करावे असे आवाहन ते शहर वासीयांना करत होते. सडक फिर्‍याविरोधात ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 31 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. नियमाचं उल्लंघन करणार्‍या विरोधात कारवाई केली जात आहे. काही नागरीक व व्यवसायीक नियम पाळत नसल्याने त्यांना आतापर्यंत दंड आकारण्यात आला. केज शहरात आज नायब तहसिलदार सचीन देशपांडे रस्त्यावर उतरले होते. शहरातील काही दुकाना सुरू असल्याची माहिती झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जावून संबंधीतांविरोधात कारवाई केली. यावेळी त्यांच्या समवेत न.प.चे असद खतीब, मंडळ अधिकारी पवार, अन्वर सय्यद, अनिल राऊत, दादा हजारे, सय्यद अतीक, शेख आजाद यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शहरातील नागरीकांनी नियमाचे पालन करावे असे आवाहन देशपांडे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!