Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडभीक मागणार्‍या बाबांचे पावणे दोन लाख हरवले तीन तासात पोलिसांनी सापडून दिले

भीक मागणार्‍या बाबांचे पावणे दोन लाख हरवले तीन तासात पोलिसांनी सापडून दिले


परळी (रिपोर्टर):-शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणारे एक वयोवृद्ध नागरीक यांनी जमा केलेली पुंजी सोमवारी (ता.24) रात्री हरवली. त्यांनी येथील पोलीसांना मंगळवारी कळवले, गुप्त विभागाने चक्रे फिरवून मंगळवारी (ता.25) अवघ्या तीन तासात 1 लाख 72 हजार 290 रुपये शोधून काढले. व त्या वयोवृद्ध व्यक्तीला परत दिले.
     येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय 80) हे घरची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने भीक मागून जगत असत. बाबूराव नाईकवाडे यांनी भीक मागून पै,पै जमा केली. परिवारात एक मुलगा,सुन असूनही त्यांचा सांभाळ करत नव्हते. म्हणून इकडून तिकडून कसेतरी आपले जीवन भागवू लागले. जमा केलेले पैसे एका पिशवीत भरून जवळच ठेवले होते. पण सोमवारी सायंकाळी त्यांच्या लक्षात आले की, आपली पिशवी हरवली आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी पोलीसांना सांगितले की, माझे 2 लाख रुपये हरवले आहेत. पोलीसांना काही विश्वास बसत नव्हता पण येथील गुप्तचर विभागाने यंत्रणा हलवत हा व्यक्ती कुठे जात होता,कुठे बसत होता,कुठे झोपत होता. याठिकाणी जावून चौकशी केली असता.अवघ्या तीन तासात या प्रकरणाचा छडा लावला व बाबूराव नाईकवाडे यांचे तब्बल 1 लाख 72 हजार 290 रूपये एका पिशवीत सापडले. व त्यांना फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. व पैसे स्वाधीन केले. यावेळी बाबूराव यांना पैसे पाहताच अश्रू अनावर आले होते.या कारवाईत
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, मधुकर निर्मळ सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!