Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडसडकफिर्‍यांमध्ये आढळले ७ टक्के पॉझिटिव्ह

सडकफिर्‍यांमध्ये आढळले ७ टक्के पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस मोठी मेहनत घेत आहे. मात्र जनता त्यांना हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास अडथळा निर्माण होत आहे. आरोग्य विभाग हा समुह संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असून बीड शहरात आठ ठिकाणी सडक फिर्‍यांच्या ऍन्टीजन टेस्ट दोन सत्रात केल्या जातात. सकाळी ७ ते ११ पर्यंत २०३ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ जण बाधीत आढळून आले. मंगळवारी ९२९ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले.


मराठवाड्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी बीड शहरासह ग्रामीण भागात मात्र त्याचा कहर वाढतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोना पॉझिटिव्हची संख्या हळूहळू कमी होत असली तरी मृत्युचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कालच्या तारखेपर्यंत बीड जिल्ह्यात तब्बल १८९५ जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. तर ८२ हजार ८३१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ७५ हजार २१७ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. जिल्ह्याचा मृत्यु दर २.२८ टक्के आहेत. पॉझिटिव्ह दर १६.३८ टक्के आहे. लोकांनी समुह संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. काल बीड जिल्ह्यातील विविध कोवीड सेंटर मधून ९२९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

Most Popular

error: Content is protected !!