Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाना. मुंडेंच्या सेवाधर्मातून प्रेरणा घेत रा.कॉं.च्या युवक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयातील बाळ-बाळांतीणींना दिले...

ना. मुंडेंच्या सेवाधर्मातून प्रेरणा घेत रा.कॉं.च्या युवक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयातील बाळ-बाळांतीणींना दिले लाखोचे साहित्य


बाळासाठी पाळणा, बेबी किटसह अन्य साहित्याचा समावेश
बीड (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतील सेवाधर्म कार्यक्रमातून प्रेरणा घेत राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते सचिन जाधव यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त अन्य खर्चाला फाटा देत जिल्हा रुग्णालयातील ३० बाळांतीणींसह नवजात बालकांसाठी बेबी किट आणि (पान ७ वर)
पाळणा आज दिला. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद असल्याने नवजात बालकांसाठी उपयुक्त साहित्य दिल्याने नातेवाईकांच्या आनंदाला उधान आल्याचे चित्र दिसून आले.
बीड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते सचिन जाधव यांचा आज वाढदिवस. यानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत केक न कापता सामाजिक कार्य करण्याचे त्यांनी ठरवले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत जो सेवा धर्माचा कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमातून प्रेरणा घेत सचिन जाधव या तरुणाने आज बीड जिल्हा रुग्णालयातील तब्बल ३० बाळांतीणींसह नवजात बालकांना उपयुक्त असे साहित्य दिले. यामध्ये बाळासाठी पाळणा, बेबी किट व अन्य साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे. लाखभरापेक्षा जास्त रुपये खर्च करून सचिन जाधव यांनी हा सेवाभाव दाखवला. सदरच्या पाळणा आणि बेबी किट हे सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक गणेश सावंत यांच्या हस्ते बाळ, बाळांतीणींना देण्यात आले. या वेळी सुधीर सांगळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव के.के. वडमारे, अजय लांडगे, सुनिल गायकवाड, मयुरसिंह बायस, नितीन जाधव, शरद जाधव, सोनू पवार, दीपक ढोले, आकाश झुनगुरे, गवळीराम तकिक यांच्यासह आदी उपस्थित होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!