Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडआला रे आला मान्सून आला…!

आला रे आला मान्सून आला…!

हे काळी धरती नांगरलेली, आली रं पेरणी
धावत ये रं काळ्या मेघा कृपा आता करी


बीड (रिपोर्टर): केरळहून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता अधिक वेगाने पुढे सरकत आहे. बुधवारी जोरदार पावसासह मुंबईत मान्सून दाखल झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच देखील सुरुवात झाली आहे.दुसरीकडे बीड जिल्हात नभ दाटून आल्याचे चित्र पाहावयास मिळत असताना जिल्हात सर्वत्र पेरणी ची लगबग सर्वत्र दिसून येत आहे .त्या साठी करावी लागणारी मशागत शेतकरी करत असून कोरोनाच्या छाताडावर पाय देऊन बळीराजा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी शेतात असल्याने शेतशिवार फुलून गेलाय

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!