Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीड52 व्या वर्षी पीआय ठोंबरेंनी केली 12 तासांची सायकलिंग

52 व्या वर्षी पीआय ठोंबरेंनी केली 12 तासांची सायकलिंग

बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या महाबिकट परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत फिटनेस चाचणी करत असतानाच वयाच्या 52 व्या वर्षी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय साईनाथ ठोंबरे यांनी वाढदिवसानिमित्त रात्रभर सायकलिंग करत तब्बल 260 कि.मी.चे अंतर कापले.

त्यांच्या या फिटनेस कर्तबगारीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय साईनाथ ठोंबरे यांनी आपल्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. काही डॉक्टर व अन्य मित्रांच्या सोबतीने रात्री नऊ ते सकाळी नऊ या 12 तासाच्या कालखंडात सलग सायकलिंग करत किमान 260 कि.मी.चे अंतर कापले. ही सायकलिंग त्यांनी बीड बायपासवरील टोलनाका ते कोल्हारवाडी या भागात त्यांनी रात्रभर सायकलिंग केली. सदरचं उपक्रम हात यांचा कौतुकास्पद असून फिटनेसकडे दुर्लक्ष करणार्‍या तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

Most Popular

error: Content is protected !!