Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईमरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना

रिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना


बीड (रिपोर्टर):- रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एकजण ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रात्री घाटसावळी जवळ घडली. जखमी व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रोहीदास काळे (रा. आंबेसावळी) हे आपल्या मुलीला सोडण्यासाठी काल माजलगावला गेले होते. मुलीला सोडून आपल्या गावी परत येत असताना घाटसावळीजवळ दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाली. यात रोहीदास काळे (वय ५३) हे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले तर मच्छिंद्र बांडे हे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!