Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडउपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये खरीप हंगामासह कोविडचा घेणार आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये खरीप हंगामासह कोविडचा घेणार आढावा


बीड (रिपोर्टर):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्हा दौर्‍यावर असून सकाळी 10 वा.च्या सुमारास जिल्ह्यातील खरीप हंगामासह कोविड विषयक आढाव्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदरची बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार हे लागलीच उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत.


बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा आणि कोविड विषयक आढाव्याच्या अनुषंगाने उद्या सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. अजित पवार उद्या बीड जिल्हा दौर्‍यावर असून कोविडच्या काळात प्रशासनाने केलेल्या कामासह कोविडच्या तिसर्‍या लाटेला सामोरे कसे जायचे यासह अन्य बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम, पिक विमा, पिक कर्ज यासह शेतकर्‍यांच्या अन्य प्रश्‍नांवर या बैठकीत माहिती घेण्यात येणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!