Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी समतेचा आक्रोश बीडमध्ये अ‍ॅड. सुभाष राऊतांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग...

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी समतेचा आक्रोश बीडमध्ये अ‍ॅड. सुभाष राऊतांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग रोखला


बीड (रिपोर्टर):- ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका रीट पिटीशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायतराज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. याचा फार मोठा परिणाम होणार असून संपुर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिचल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींच्या राखीव असलेल्या जवळपास 56 हजार जागांवर याचा परिणाम होणार आहे. हे आरक्षण वाचवण्यासाठी आज समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार बीडमध्ये जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सामील झाले होते.

200573811 236567694612258 7545593813691712604 n


ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक पुर्ततेअभावी स्थगिती कगरण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी संघटनांनी आज एकत्र येत आंदोलन केले. बीडमध्ये बीडबायपास चौक येथे जालना रोडवर भव्य आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. राज्यातील पाच जिल्ह्यातील स्तानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे.

197366166 149977600422478 8780747076313674872 n

सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 27 महानगरपालिकांच्या एकूण 2 हजार 736 जागांमधून 740 जागा कमी होत आहेत. 128 नगरपंचायती व 241 नगरपालिकांमधल्या 7 हजार 493 जागांपैकी 2 हजार 99 जागा कमी होणार आहेत. 34 जिल्हा परिषदेतील 2 हजार जागांपैकी 535 जागा तर 351 पंचायत समितींमधील 4 हजार जागांपैकी 1 हजार 29 जागा कमी होणार आहेत. 27 हजार 782 ग्रामपंचायतमधील अंदाजे 1 लाख 90 हजार 691 जागांपैकी 51 हजार 486 जागा ह्या ओबीसी समाजाच्या कमी होत आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर संपुर्ण देशावर होणार आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी समता परिषदेचे अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभर ओबीसींचे आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. बीडमध्ये अ‍ॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जालना रोड बीड-बायपास येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Most Popular

error: Content is protected !!