Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमहजेरी न लिहिल्याच्या कारणावरुन लिपीकाची शिक्षकास जीवे मारण्याची धमकी

हजेरी न लिहिल्याच्या कारणावरुन लिपीकाची शिक्षकास जीवे मारण्याची धमकी


परळी (रिपोर्टर):- शहरातील महर्षि कणाद विद्यालयातील लिपीकाकडुन याच शाळेतील शिक्षकास तु माझ्या बायकोच्या वर्गाची हजेरी का लिहीली नाहीस असे म्हणत फोनवरुन शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लिपीक केशव भांगे यांच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील महर्षि कणाद विद्यालयातील शिक्षक सतिश जाधव हे दि.१६ जुन रोजी शाळेतील कामकाज अटोपुन घराकडे निघाले असता रस्त्यात त्यांना शाळेतील लिपिक केशव निवृत्ती भांगे यांचा फोन आला व तु माझ्या बायकोच्या वर्गाची हजेरी का लिहीली नाहीस असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली व तु उद्या शाळेत आला की तुझे पाय तोडतो,मी चार खुन करणार असुन त्यात तुझा पहिला खुन करणार असल्याचे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात केशव भांगे यांच्याविरुध्द कलम २९४,५०७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.कॉ.बडे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!