Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडस्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तलवाड्यात आंदोलन

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तलवाड्यात आंदोलन

बीडच्या पिक विमा पॅटर्नमध्ये सुधारण करण्याची मागणी
गेवराई (रिपोर्टर)ः-कंपन्या व राज्य सरकारला मालामाल करुन शेतकर्‍यांना गाजर दाखवण्यार्‍या बीडच्या पिकविमा पॅटर्नमध्ये सुधारणा करावी, खरीप हंगाम 2020-21 पिकविमा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी तलवाडा येथे बोंब मारो आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरिप हंगामातील पिक विमा योजनेत जवळपास 17 लाख 91 हजार 552 शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये शेतकरी राज्य व केंद्र मिळून जवळपास 798 कोटी 58 लाख रुपये भरणा केला होता. मात्र त्यापैकी फक्त 19 हजार 344 शेतकरी सभासदांना 12 कोटी 19 लाख रुपये भरपाई पोटी मिळणार आहे. वास्तवीक जिल्ह्यात खरीप हंगामातील पिक जोमात होते. मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाने केलेल्या पंचनाम्यात जवळपास 4 लाख 32 हजार 703 शेतकर्‍यांचे नुकसान असल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला पिक विमा कंपनीने पाणे पोसण्याचे काम केले आहे. यासह विविध मागण्यां घेवून आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे बोंब मारो आंदोलन करण्यात आले.
रावेळी पूजताई मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्रक्ष गजानन बंगाळे पाटील, विदर्भ अध्रक्ष प्रशांत डीक्कर, शं शाह, गोविंदवाडी सरपंच राहुल मराठे, पंचारत समिती सदस्र शाम कुंड रांनी मार्गदर्शन केले रावेळी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार सचिन खाडे, तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, मंडलाधिकारी तसेच स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा अध्रक्ष गजानन बंगाळे, विदर्भ अध्रक्ष प्रशांत डिक्कर, डॉ. आसाराम मराठे, पंचारत समिती सदस्र शाम कुंड, सरपंच सुंदर तिवारी, गोविंदवाडी चे सरपंच राहुल मराठे, गणेश मोरे, खंडू उनावणे, बाळु कर्वे, किशोर आखरे, सुशील गिरी आदी पत्रकार शेतकरी बांधव उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!