Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडउपमुख्यमंत्री अजित पवारांनी झापल्यानंतर सिओ लागले कामाला सकाळपासून शहरातील स्वच्छतेला झाली सुरूवात

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झापल्यानंतर सिओ लागले कामाला सकाळपासून शहरातील स्वच्छतेला झाली सुरूवात


बीड (रिपोर्टर)ः- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये न.प.चे सिओ गुट्टे हे उशिरा आले. त्यानंतर गुट्टेंना पवारांनी चांगलेच फैलावर घेत शहरातील स्वच्छतेबाबत झापझाप झापले. उपमुख्यमंत्र्यांनी झापल्यानंतर सिओ शहरातील स्वच्छतेच्या कामाला लागले. आज सकाळपासून कर्मचारी शहर स्वच्छ करत असल्याचे दिसून आले.
काल जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ना.अजित पवार यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीला न.प.चे सिओ गुट्टे उशिरा आले. गुट्टेंना ना.पवार यांनी अनेक प्रश्‍न विचारले असता त्यांची बोबडी वळली. शहरातील स्वच्छतेबाबत त्यांना चांगलेच झापझाप झापले. शहरातील स्वच्छता दोन दिवसात केली नाही तर कारवाई केली जाईल असा ईशाराही अजीत पवार यांनी गुट्टेंना दिला होता. पवारांनी झापल्या नंतर गुट्टे सकाळपासून कामाला लागले. शहर स्वच्छ करण्यासाठी कर्मचार्‍यांनी सकाळपासूनच सुरूवात केली होती. शहरातील अनेक गल्ली बोळात अस्वच्छता आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पवारांनी झापल्यानंतर गुट्टे ताळ्यावर आले. आता किती दिवसात शहर स्वच्छ होईल आणि कायम स्वरुपी शहरात स्वच्छता राहील का असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!