बीड (रिपोर्टर) गेल्या अनेक वर्षांपासून महत्वपुर्ण असा शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाचा टेबल सांभाळणारे मोराळे हे कार्यरत आहेत. मोराळे यांनी राजकीय लांगेबाधेतून शिक्षण विभागातील हा महत्वाचा टेबल पदरात पाडून घेतला आहे. ते कोणत्याही शिक्षकाचे वैद्यकीय बील पैसे घेतल्याशिवाय काढत नाहीत. जे शिक्षक आपले वैद्यकीय बिल काढण्यासाठी पैसे देणार नाहीत त्या बिलामध्ये हे महाशय जाणूनबुजून त्रुटी काढतात आणि ते बील फेटाळतात. त्यामुळे अनेक शिक्षकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. अशा मोराळेंची पाठराखण सीईओ अजित पवारांकडून कशासाठी केली जाते?
गेल्या चार वर्षांपासून मोराळे यांच्याकडे शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचा महत्वाचा टेबल आहे. अनेक शिक्षक हे स्वत: किवा आपल्या नातेवाईकांच्या आजारावर स्वत:च्या खिशातून लाखो रुपये खर्च करतात. काही शिक्षकांच्या नातेवाईकांना तर कॅन्सरसारख्या दुर्धर अशा आजारातून जावे लागते. प्रसंगी अशा शिक्षकांच्या नातेवाईकांचा मृत्यूही होतो. या आजारावर केलेला खर्च जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वैद्यकीय बिचलांच्या परिपूर्तीसाठी दिला जातो. एका बिलाची फाईलही सहा-सहा प्रतिमध्ये केल्यानंतर तब्बल बील दाखल केल्यानंतर सहा महिने ते एक वर्ष या शिक्षकाला हे बिल मिळण्यासाठी सरकारी दवाखाता ते शिक्षण विभागात अशा अनेक चकरा माराव्या लागतात. शिक्षण विभागात फाईल आल्यानंतर मोराले नावाचे गृहस्थ जे शिक्षक आपले बिल काढण्यासाठी दहा टक्के कमिशन देतील अशा शिक्षकांच्या बिलाच्या फाईली काढल्या जातात. जे शिक्षक बिल काढण्यासाठी पैसे देत नाहीत अशा फाईलमध्ये मोराळे हे जाणूनबुजून त्रुटी काढतात आणि ही त्रुटी मी काढलीच नाही तर या बिलाच्या समितीने काढली आहे, असे म्हणून स्वत:चे हात झटकतात. अशा टक्केवारी खाणार्या मोराळेंवर मुख्य कार्यकराी अधिकारी अजित पवार यांनी मेहरबानी न करता त्यांना तात्काळ निलंबीत करावे, अशी मागणी त्रस्त शिक्षकांकडून होत आहे.