बीड (रिपोर्टर)ः- बीड शहरातील महावीर फुड्सचे प्रमुख अशोक लाल भगवानदास भंडारी (वय-73 वर्षे) यांचे मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी 10.45 वा. निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज दि. 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पार्थीव देहावर मोढा रोड वरील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अॅड.आर.बी.भंडारी यांचे ते बंधु होते. तसेच गिरीष, अमोल यांचे पिता होते. भंडारी कुटूंबीयांच्या दुखाःत रिपोर्टर परिवार सहभागी आहे.