Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडाबीड जिल्ह्यातील पदवीधर चव्हाणांच्या पदोपदी पाठीशी

बीड जिल्ह्यातील पदवीधर चव्हाणांच्या पदोपदी पाठीशी

सतीश चव्हाणांच्या गाठीभेटी, कॉर्नर बैठकांसह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
चव्हाणांच्या विजयावर शिक्कामोर्तब
बीड (रिपोर्टर)- औरंगाबाद पदविधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस-शिवसेना व मित्र पक्षांचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी काल बीड शहरात वकील, डॉक्टर, राजकीय, सामाजिक, नेते, कार्यकर्ते यांच्यासह शिक्षकांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार उपस्थितांकडून करण्यात आला. शिक्षकांसह पदवीधरांच्या महामेळाव्यात सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण काल बीडमध्ये डेरेदाखल झाले. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या मतदानाच्या निमित्ताने सतीश चव्हाण यांनी बीड शहरातील विविध राजकीय, सामाजिक, नेते, कार्यकर्ते यांची भेट घेतली. वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक यांच्या कॉर्नर बैठका घेऊन आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिक्षकांसह पदवीधरांच्या महामेळाव्यास उपस्थित राहून या मतदारसंंघात पुन्हा मला सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन सतीश चव्हाण यांनी केले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेले दोन टर्म सतीश चव्हाण नेतृत्व करत असून शिक्षक, प्राध्यापकांसह पदवीधरांचे प्रश्‍न ते मार्गी लावत आले आहेत. पुन्हा एकदा या निवडणुकीत सतीश चव्हाण उतरल्याने बीड जिल्ह्यातील पदवीधरांनी चव्हाण यांनाच विधान परिषदेत पाठवायचे, असा ठाम निर्धार केल्याचे चित्र काल त्यांना मिळत असलेल्या ठिकठिकाणच्या प्रतिसादावरून दिसून येत होते. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दुचाकीवर चव्हाणांचे सार्थ्य करून बीड तालुक्यातून मोठ्या संख्येने मतदान देणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पदवीधर यांच्या ठिकठिकाणी भेटी, कॉर्नर बैठका आणि जाहीर मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद सतीश चव्हाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करत असल्याचे चित्र कालच स्पष्ट झाले.

Most Popular

error: Content is protected !!