बीड (रिपोर्टर) तेलंगाणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची उद्या छत्रपती संभाजीनगर येथे भव्य जाहीर सभा होत असून या वेळी पक्षप्रवेशही होणार आहे. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार असून सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन दिलीप गोरे यांनी केले आहे.
उद्या दि. 24 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जबिंदा मैदानावर सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होत आहे. या सभेत अनेक कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करणार असून छत्रपती संभाजीनगर येथे होणार्या सभेला बीडमधून दिलीप गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन दिलीप गोरे यांनी केले आहे. कार्यक्रमाला तेलंगणा येथील मुख्यमंत्र्यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार असून ही सभा ऐतिहासिक होणार आहे.