Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमराजकारणात मध्ये मध्ये करतो म्हणत युवकावर तलवारीने हल्ल

राजकारणात मध्ये मध्ये करतो म्हणत युवकावर तलवारीने हल्ल


बीड (रिपोर्टर)ः- राजकारणात मध्ये मध्ये करतो असे म्हणत कर्जणी येथील एका युवकांवर कत्ती, तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना कर्जणी रोडवर घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसांत आरोपी विरोधात ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कर्जणी येथील गणेश विश्‍वनाथ साबळे वय-३० वर्षे या युवकावर शुभम हनुमान बागलाने रा.काकडहिरा, अमोल श्रीराम कदम रा.कर्जणी, सुशांत कल्याण सपकाळ, रविंद्र कल्याण सपकाळ यांनी कर्जणी रोडवर गणेशला गाठून गंभीर मारहाण करत कत्ती आणि चाकूने त्याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी गणेश साबळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १७१/२०२१ कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवीसह कलम ४/२५ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी वाळके यांनी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करीत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!