• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाक नकटं, साज-श्रृंगार नेटकं. सगळं चुकलं, सरकार वाचलं

by गणेश सावंत
May 11, 2023
Reading Time: 1 min read
0
नाक नकटं, साज-श्रृंगार नेटकं. सगळं चुकलं, सरकार वाचलं
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या ज्या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे राज्याचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. तो निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. नाक नकटं, पण साज-श्रृंगार नेटका असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. न्यायालयाने सुरुवातीलाच निरीक्षण नोंदवताना उद्धव ठाकरेंच्या बाजुने तीन निरीक्षणे केली. तेव्हा निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजुने पुर्णत: जाईल, असे वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी दिलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा या संपुर्ण निकालाला कलाटणी देणारा ठरला. आजच्या निकालात 5 बेंचच्या कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला तर दुसरीकडे शिंदे गटाच्या व्हिपची नियुक्ती विधानसभा अध्यक्षांनी बेकायदेशीररित्या केल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीर गंभीर ताशेरे ओढताना बहुमत चाचणी बोलावणं गरजेचं नव्हतं, कोश्यारी यांनी विशेष अधिकाराचा गैरवापर केल्याचे म्हटले. त्यामुळे सर्वकाही चुकलं, परंतु राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार वाचलं असच यातून दिसतं.
शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर गेले 10 महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने यावरील ऐतिहासिक व दूरगामी निकाल दिला. नऊ दिवसांच्या सलग सुनावणीनंतर 16 मार्च रोजी यासंदर्भातील निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता माजी सरन्यायाधीश अहमदी यांची शोकसभा झाली. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं. शिवसेना नेमकी कोणाची, राज्यातील बंडखोरी व सत्ताबदल कायदेशीर की घटनाबाह्य अशा प्रश्‍नांभोवती फिरणारी सत्तासंघर्षाची सुनावणी गेल्या महिन्यात संपली. राज्यघटनेचे दहावे परिशिष्ट, राज्यपालांची भूमिका, नबाम रेबिया व कर्नाटकातील एस. आर. बोम्मई यांसारख्या पूर्वीच्या प्रकरणांच्या निकालांचा उल्लेख युक्तिवादादरम्यान झाला.

सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन राज्यपाल कोश्यारींवर ताशेरे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उचललेल्या पावलांबाबतही घटनापीठाने अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्‍वासाचा प्रस्तावही दिला नव्हता. उद्धव ठाकरे सरकारने विश्‍वास गमावला आहे की नाही, हे राज्यपालांनी आधी तपासायला हवे होते, असं निकालात घटनापाठीने म्हटलंय. तसेच भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित करत राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. त्यापुढेही जाऊन बहुमत चाचणी ही पक्षांतर हत्यार म्हणून वापरणं गैर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही, असं घटनापीठाने गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे.

अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरी
शिवसेना आहोत हा दावा केला जाऊ शकत नाही
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भरत गोगावले यांना व्हिप (प्रतोद) म्हणून विधानसभाध्यक्षांनी मान्यता देणे बेकायदा असल्याचं घटनापीठाने म्हटलेलं आहे. या केसमध्ये व्हीप कुणाचा वैध ठरणार हे खूप महत्त्वाचे आहे. नेमकी कुणाची बाजू योग्य आहे, हे विधानसभा अध्यक्षांनी पडताळून न पाहता भरत गोगावले यांना व्हिप म्हणून मान्यता दिल्याचा शेरा आजच्या निकालपत्रातून मारण्यात आला. शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आणि दोन व्हिप असताना विधानसभाध्यक्षांनी चौकशी करणे गरजेचे होते. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हिप आहे, हे विधानसभाध्यक्षांनी तपासायला हवे होते, असं महत्त्वाचे निरीक्षण घटनापीठाने नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळपक्षातील नाळ म्हणून प्रतोद काम करत असतो. आमदार राजकीय पक्षाकडून वेगळे होऊ शकत नाही. व्हीपला दहाव्या परिशिष्ठात महत्त्व असते. अध्यक्षांना 3 जुलै 2022 रोजी पक्षात फुट असल्याचं माहित असताना त्यांनी नियुक्ती केली.
विधानसभा अध्यक्षांनी दोन व्हिप नेमायला नको हेते. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्षानं दिलेला व्हिप नेमायला हवा होता, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांच्या व्हिप नियुक्तीला बेकायदेशीर ठरवलं.
नबाम रेबिया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
27 जून 2022 दिलेला निकाल नबाम रेबियावर आधारित नव्हता. त्यावेळी उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटीसला उत्तर देण्याच्या मुदतीला वाढ देण्यात आली होती. नबाम रेबिया प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देत आहेत. अध्यक्षांना हटवण्याची नोटीस ही त्यांच्या निलंबित करण्याच्या अधिकारावर मर्यादा येते. त्यामुळं हे प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवत आहोत. केसच्या मेरिटवर आम्ही हे नबाम रेबिया प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवत आहोत.

Previous Post

नवरा-बायकोच्या भांडणात दोन मुलींना विष पाजलं एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर

Next Post

आ. संदीप क्षीरसागरांना मार्केट

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘परिवर्तन अटळच’ प्रस्थापितांच्या अमिषाला बळी पडू नका

आ. संदीप क्षीरसागरांना मार्केट

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?