Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईमसुर्डी प्रकरणातील तपास आता डिवायएसपी पाटील करणार

सुर्डी प्रकरणातील तपास आता डिवायएसपी पाटील करणार

आ.प्रकाश सोळंके, आ.संदिप क्षीरसागर यांनी घेतली पिडितेच्या कुटुंबियांची भेट
बीड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयात आरोपीचा पीसीआर मागितला नाही. त्यामुळे आरोपीला एमसीआर मिळाला. तपासी अधिकार्‍याकडील तपास काढुन घेण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक लांजेवार यांनी गायकवाड यांच्याकडील तपास काढुन तो डिवायएसपी सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला. आज आ.प्रकाश सोळंके, आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयात जावून पिडितेच्या कुटुंबियांची जिल्हा रूग्णालयात जावून भेट घेतली.


माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील नऊ वर्षीय बालिकेवर नराधम पुरूषोत्त श्रीराम घाटुळ याने अत्याचार केला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६ (एम) ४,५ (एम) ६,१० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील तपासी अधिकारी गायकवाड यांनी आरोपीचा पीसीआर न्यायालयात मागितला नाही. न्यायालयाने आरोपीला एमसीआर दिला. पीसीआरची मागणी का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. तपासी अधिकार्‍याने तपासात हयगयपणा केला असून तपासी अधिकारी बदलण्यात यावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आल्यानंतर प्रभारी पोलीस अधिक्षक लांजेवार यांनी गायकवाड यांच्याकडचा तपास काढत डीवायएसपी सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला. आज माजलगावचे आ.प्रकाश सोळंके, बीडचे आ.संदिप क्षीरसागर, सभापती जयसिंह सोळंके यांनी जिल्हा रूग्णालयात जावून पिडिता व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक लांजेवार, डीवायएसपी सुरेश पाटील, सीएस डॉ. सुरेश साबळे यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!