Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडबीडच्या रेल्वेसाठी माजी मंत्री सुरेश नवले रेल्वे राज्यमंत्री दानवेंना भेटले

बीडच्या रेल्वेसाठी माजी मंत्री सुरेश नवले रेल्वे राज्यमंत्री दानवेंना भेटले

बीडसह मराठवाड्यातील अन्य रेल्वे मार्गासाठी दिले निवेदन
बीड (रिपोर्टर):- नगर-बीड-परळी मार्गासह सोलापूर-बीड-जालना-खामगाव व जळगाव रेल्वे मार्गाबाबत गतीने काम होऊन ते काम लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावे, यासाठी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, अर्जुन खोतकर, विनायक निमन यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत रेल्वे मार्गाबाबत चर्चा करून मागणीचे निवेदन दिले.


मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे माजी मंत्री प्रा. सुरेा नवले यांच्यासह अन्य आमदारांनी भेट घेत मराठवाड्यातील रेल्वे मार्गाप्रश्‍नी चर्चा करत निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. या मार्गाचे काम जलदगतीने सुरू करत हा मार्ग लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावा, अशा आशयाची मागणी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी या वेळी केली. दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन प्रा. नवलेंसह अर्जुन खोतकर, विनायक निमन यांनी मराठवाड्यातील अन्य रेल्वे मार्गांबाबतही चर्चा केली. नगर-बीड-परळी-सोलापूर, बीड-जालना व खामगाव व जळगाव या रेल्वे मार्गाकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचे त्यांनी या वेळी सांगितले. प्रा. नवले यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाड्यासाठी किती महत्वाचा आहे हे सांगत हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पुर्ण व्हावा, अशा आशयाचे निवेदनही त्यांनी या वेळी दिले.

Most Popular

error: Content is protected !!