Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईममुलीचे अश्‍लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून धमकी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

मुलीचे अश्‍लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून धमकी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- एका मुलीचे अश्‍लील फोटो व्हॉटस्‌ऍप स्टेटसला आणि फेसबुकला पोस्ट करून धमकी दिली. या प्रकरणी पित्याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ४९ वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी ८६२३९८९८३२ या व्हॉटस्‌ऍप क्रमांकावरून फिर्यादीच्या मुलीला ८ जुलै ते २३ जुलै २०२१ दरम्यान मुलीचे अश्‍लील फोटो पाठवून व्हॉटस्‌ऍप स्टेटसला ठेवून धमकी दिली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९८/२०२१ कलम ३५४ (क), २९२, ५०६, ५०६ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साबळे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!