मुंबई, (रिपोर्टर):-गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीची परीक्षादिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 5 जून दरम्यान लागण्याची शक्यता आहे.निकालाची तयारी पूर्णदहावीच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे.
बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची परिस्थिती असल्याने शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी शिक्षण मंडळाने ही सूट काढून घेण्यात आली होती. परिणामी याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा बारावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.97 टक्क्यांनी लागला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.