Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या हस्ते मराठा क्रांती भवनाचे भुखंड हस्तांतरण

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या हस्ते मराठा क्रांती भवनाचे भुखंड हस्तांतरण


बीड (रिपोर्टर):- बीड शहरामध्ये मराठा समाजासाठी हक्काची जागा असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. या मागणीचा दखल घेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी समाजासाठी राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान, राजीव गांधी चौकमध्ये नियोजीत मराठा क्रांती भवन निर्माण करण्यासाठी आज जागा उपलब्ध करून दिली.


त्या निमित्ताने हस्तांतर सोहळा आज दुपारी १ वाजता सुरू झाला असून या सोहळ्याला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.अनिल बारकुल, मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळुक, डॉ.योगेश क्षीरसागर, दिलीप गोरे, किशोर पिंगळे, सुभाष सपकाळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करून राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करत सदरच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजातील विविध संघटनांनी मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांसह डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे वेळोवेळी केली होती. त्या मागणीची दखल घेत आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसाागरांच्या हस्ते नियोजीत मराठा क्रांती भवनाच्या भुखंडाचे हस्तांतरण करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!