Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeराजकारणमग आम्हीही भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर देऊ-नाना पटोले

मग आम्हीही भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर देऊ-नाना पटोले


मुंबई (रिपोर्टर):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपालांनी केली होती. राज्यपालांनी नेहरूंवर केलेल्या टीकेला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपालांना शोभत नाही. त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं, असा टोलाही पटोले यांनी लगावला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. त्यापैकी पटोले जहाल गटातील असल्याची टीका झाल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं. यावर नाना पटोले यांनी भाष्य केलं. माझी तक्रार तर देशाच्या प्रमुखांकडे देखील आजकाल होते. त्यामुळे माझी पक्षाकडे तक्रार होत नाही. हा नाना पटोले देशासाठी लढणारा आहे.

Most Popular

error: Content is protected !!