गोपीनाथगड (रिपोर्टर) लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली. आज सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दुपारी ह.भ.प. ढोक महाराज यांच्या कीर्तन सेवेला आरंभ झाला. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांच्यासह आदी मान्यवर गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तत्पूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची एकतास चर्चा झाली.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना ईहलोकी जाऊन आज 9 वर्षे झाले. तरीही गोपीनाथराव आपल्यात आहेत, त्यांची कारकिर्द ही अविस्मरणीय आहे. आज नवव्या पुण्यस्मरणानिमित्त गोपीनाथगडावर बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शविली. स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम गडावर सुरू असून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ह.भ.प. ढोक महाराज यांच्या कीर्तन सेवेला आरंभ झाला होता. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जावून समाधीस्थळाचे दर्शन घेतले. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे या गडावर उपस्थित आहेत. त्यांनी आज सकाळी स्व. मुंडेंच्या समाधीस्थळी जात दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
पंकजा मुंडे-एकनाथ खडसेंची एकतास चर्चा
मुंडे-खडसे कुटुंबियांचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासूनचे असून स्व. गोपीनाथराव मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीत एकत्र काम केले. एकनाथ खडसे हे मुंडेंना आपला नेता मानायचे. आज खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत आहेत आणि पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून त्या भाजपावर नाराज असल्याची चर्चा सातत्याने होते. आज एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची परळीत बंद दाराआड एकतास चर्चा झाली. याबाबतच्या बातम्याही प्रसारीत झाल्या.