Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीड‘तो’ रेल्वे पोलीस कर्मचारी निलंबित

‘तो’ रेल्वे पोलीस कर्मचारी निलंबित


परळी (रिपोर्टर):-रेल्वे प्रवासादरम्यान असलेल्या पेट्रोलिंग करीत बंदुकीची सफाई करून गोळ्या भरत असताना चुकून फायरिंग झाल्याने रेल्वे राखीव पोलिसांचा एक कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे.ही घटना दि 24 रोजी दुपारच्या सुमारास घडली.


या बाबतीत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की दि 24 रोजी रेल्वे पोलीस कर्मचारी बाबूलाल चाहर हे पेट्रोलिंग करीत बंदूक साफ करून गोळ्या लोड करीत असताना चुकून फायरिंग झाली व गोळी समोरील भिंतीवर जाऊन लागली .या घटनेत कोणीही कर्मचारी जखमी झाला नसून रेल्वे पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठांना याची कल्पना दिली.
या प्रकरणी रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यांचे एक पथक मंगळवार दि 3 रोजी परळीत येऊन सविस्तर चौकशी करून रेल्वे पोलीस कर्मचारी बाबूलाल चाहर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक मुलकुनाईक यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!