बीड (रिपोर्टर): किरकोळ कारणावरून ऐंशी वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना पाटोदा तालुक्यातील उंबरहिरा येथे घडली. फरार झालेल्या आरोपीला पाटोदा पोलिसांनी दोन तासांच्या आत जेरबंद केले. ही घटना काल सकाळी घडली.
पंढरीनाथ सुभाजी गाडे (वय 80) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते एकटेच उंबरहिरा (ता. पाटोदा) येथे राहाचे. त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी आण्णा गैदी गाडे याने मयत पंढरीनाथ गाडे यांच्या घरातील काही सामान घेतले होते. माझ्या घरातील सामान का घेतले, असा जाब विचारण्यासाठी पंढरीनाथ हे त्याच्याकडे गेले असता त्याने डोक्यात दगड घालून लाकडाने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पंढरीनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती पायोदा पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख नवघरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. आरोपीच्या मागावर दोन पथके पाठविली अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या.