Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआजच्या अहवालात ६८६२ निगेटिव्ह

आजच्या अहवालात ६८६२ निगेटिव्ह


बीड (रिपोर्टर):- गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात अँटीजेन टेस्ट वाढवल्या आहेत. आज आरोग्य विभागाला ७ हजार १ संशयितांच्या कोरोना टेस्टचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ६ हजार ८६२ जण निगेटिव्ह आले असून १३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या आसपास आहे. आता आरोग्य विभागाने कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या असल्या तरी ही संख्या दोनशेच्या आतच आहे. आज आलेल्या ७००१ संशयितांच्या अहवालामध्ये १३९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बाधित हे आष्टी तालुक्यातील आहेत. ते तब्बल ५८ आहेत. तर अंबाजोगाई ३, बीड १८, धारूर १४, गेवराई १२, केज ४, माजलगाव ८, परळी ६, पाटोदा १२ आणि वडवणी तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!