Monday, January 24, 2022
No menu items!
Homeखेळगोल्डन बॉय नीरजला पंतप्रधानांनी खायला दिला चूरमा; सिंधूला मिळालं आईस्क्रीम

गोल्डन बॉय नीरजला पंतप्रधानांनी खायला दिला चूरमा; सिंधूला मिळालं आईस्क्रीम

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिकच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात आतापर्यंतची यशस्वी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकचं वैशिष्ट म्हणजे भारताने यंदा सर्व प्रकारची पदके जिंकली आहे. १ सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे.

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खेळाडूंचे स्वागत आणि अभिनंदन केलं. कार्यक्रमानंतर त्यांनी सर्व भारतीय खेळाडूंची भेट घेतली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला त्यांनी चुरमा खायला दिला. तसेच कांस्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला आईस्क्रीमची पार्टीही दिली. ऑलिम्पिक इतिहासात दोन पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

Most Popular

error: Content is protected !!