Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडबीड भाजपात ‘आधे इधर आधे उधर, बोराळकर किधर’?’, चव्हाणांसाठी मुख्यमंत्र्यांपासून आघाडीचे सर्वच...

बीड भाजपात ‘आधे इधर आधे उधर, बोराळकर किधर’?’, चव्हाणांसाठी मुख्यमंत्र्यांपासून आघाडीचे सर्वच नेते सक्रिय


बीड (रिपोर्टर)- मराठवाडा पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपातील बंडखोरीमुळे बीड जिल्ह्यात भाजपाचे नेते, कार्यकर्ते ‘आधे इधर आधे उधर’ झाल्याचे दिसून येत असल्याने बोराळकर किधर? हा प्रश्‍न उपस्तित होत असतानाच दुसरीकडे आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांची प्रचार यंत्रणा मात्र ७८ तालुक्यात तळ ठोकून असल्याने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आघाडीच्या सर्वच पक्षातील नेते या निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याने चव्हाणांना ही निवडणूक सोपी जात असल्याचे चित्र सध्या दिसून बंडखोर पोकळेंमुळे भाजपा उमेदवाराची आणि नेतृत्वाची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपाच्या अंतर्गत बंडाळीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघात बोराळकर हेच आपले उमेदवार अहोत हे सांगण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना तालुक्या तालुक्यात जावून लोकांना सांगावे लागत आहे. बंडखोर रमेश पोकळे यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही या प्रश्‍नाचे उत्तर पक्षश्रेष्ठीवर ढकलण्यात येत असल्याने भाजपा समर्थक आजही नेमके कुठल्या उमेदवाराला मतदान करायचे या मन:स्थितीत आहेत. बीड जिल्ह्यात तर पंकजा मुंडे यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरील नेते हे उघडपणे बंडखोर नेते रमेश पोकळेंच्या सोबत दिसून येत आहेत. त्यामुळे बीड भाजपात आधे इधर आधे उधर बोराळकर किधर? हा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे. पंकजा मुंडे दोन दिवसांपासून मराठवाड्यात ठिकठिकाणी बोराळकरांसाठी मत मागत असल्या तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रमेश पोकळेंकडेही दिसून येत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही भाजपा उमेदवारात गोंधळ कायम आहे. दुसरीकडे मात्र आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ही निवडणूक सोपी असताना त्यांनी प्रचार यंत्रणेत कसलीही कुचराई न ठेवता मतदारसंघातल्या ७८ तालुक्यात संपर्क ठेवल्याचे दिसून येत आहे. आघाडीमधील शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तालुका, जिल्हास्तरावरील नेतेच नव्हे तर राज्यपातळीवरील नेतेही चव्हाणांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्या व्हिडिओमधून मुख्यमंत्र्यांनी सतीश चव्हाणांच्या आजपर्यंतच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे आघाडीचे सर्वच नेते चव्हाणांना निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्वत: उमेदवार असल्यागत मतदारांपर्यंत जात आहेत.

Most Popular

error: Content is protected !!