Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडपोलीस कर्मचार्‍याच्या गर्भवती पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या ,छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली

पोलीस कर्मचार्‍याच्या गर्भवती पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या ,छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली

लक्ष्मीच्या सणादिवशी दरडवाडी येथे घडली दुर्दैवी घटना
नांदुरघाट (रिपोर्टर)- सासु-सासरे आणि पतीच्या जाचास कंटाळून गर्भवती असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नीने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे घडली. आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दोषीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केली. दरम्यान महालक्ष्मीच्या सणा दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याने केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
   ज्योती गोविंद जाधवर या महिलेचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. सदरील या महिलेचा पती गोविंद जाधवर उस्मानाबाद येथे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी ज्योती हिचा सासरच्या लोकांकडून छळ केला जात असे. शुक्रवारी या महिलेस तिच्या पतीने दरडवाडी येथे माहेरी सोडले होते. काल या महिलेने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील हा प्रकार नांदूरघाट येथील पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, जयवंत शेप, शेख रशीद यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. आज सकाळी मयत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सासरच्या लोकांमुळेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला असून या प्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहेरच्या लोकांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!