Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडकेजपावसाने केजमध्ये राज्य महामार्गावरील पुल वाहून गेला

पावसाने केजमध्ये राज्य महामार्गावरील पुल वाहून गेला


धनेगावचे सर्व दरवाजे उघडले; मालेगाव पाझर तलावाला पडले भगदाड
कुंभेफळमध्ये घरात पाणी घुसले; काशीदवाडीत दहा घरे पडली
दोन गाई वाहून गेल्या; जवळबनमध्ये 8 शेळ्या वाहून गेल्या

केज । सय्यद माजेद
चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये धुव्वाधार पाऊस पडत आहे. रात्री पुन्हा केज तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला. नद्या-नाल्या ओसांडून वाहिल्या. धनेगावच्या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अतिरिक्त पावसामुळे राज्य महामार्गावरील पुल वाहून गेल्याने महामार्गावरची वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. मालेगाव पाझर तलावाला भगदाड पडल्याने या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कुंभेफळासह अन्य गावात पाणी घुसले तर काशीदवाडीत दहा घरे पडून नुकसान झाले. जवळबनमध्ये 8 शेळ्या वाहून गेल्या आहेत. महसूल विभागाने अनेक ठिकाणी जावून पडझडीची पाहणी केली.


बीड जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून धो-धो पाऊस पडत आहे. रात्री केज तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला. राज्य महामार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे अर्धवट बांधकाम रात्रीच्या पावसामुळे वाहून गेल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मांजरा धरण पुर्णत: भरल्याने रात्री पुन्हा तलावामध्ये पाण्याचा ओघ वाढल्याने धरणाचे पुर्ण दरवाजे उघडण्यात आले. मालेगाव येथील तलावाला भगदाड पडल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सोनीजवळा येथील कोकाटे वस्तीवरील बंधारा फुटल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. रात्रीच्या पावसाने कच्च्या घरांना तडे गेले. कुंभेफळ येथे अनेकांची घरे पडली आहेत. सावळेश्वर पैठण येथे घरे पाण्यात गेली असून इतरत्र लोकांना हलविण्यासाठी एनडीआरचे पथक त्याठिकाणी दाखल झाले होते. काशीदवाडीतही दहा घरे पडले. आवजगावात दोन गायी व जवळबणमध्ये आठ शेळ्या वाहून गेल्या. रात्रीच्या पावसाने तालुक्यात हाहाकाल माजवल्याने महसूल विभागाचे नाय तहसीलदार सचीन देशपांडे, लक्ष्मण धस, मंडल अधिकारी पवार, केज ठाण्याचे पोलीस कर्मचारी मदतीसाठी ज्या त्या ठिकाणी सज्ज झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!