Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूहानी

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूहानी


बीड (रिपोर्टर)- रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशूहानी झाली असून यामध्ये सर्वात जास्त पशूहानी ही अंबाजोगाई तालुक्यात झाली आहे. 80 शेळ्या, मेंढ्या आणि वासरे आणि दूधाळ जनावरे मिळून जवळपास 90 जनावरे या पावसात मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांवर पिकांसोबतच जनावरे दगावल्याने दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.


जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गेवराई, बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावले आहेत. यामध्ये बीड तालुक्यात दोन शेळ्या, गेवराई तालुक्यात पाच शेळ्या तर केज येथे 10 घरांची पडझड झालेली आहे. त्यासोबतच अंबाजोगाई तालुक्यात प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार शेतामध्ये असलेल्या 80 शेळ्या, मेंढ्या या पावसात दगावल्या आहेत. त्यासोबतच 40 गाय-म्हशीची वासरे आणि दुधाळ जनावरे 50 दगावले आहेत. शेतकर्‍यांच्या पिकांसोबत जोडधंदा म्हणून असलेली जनावरेही मृत्यूमुखी पडल्यामुळे शेतकर्‍यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

Most Popular

error: Content is protected !!