Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआभाळ फाटले, गुलाबचे काटे अंगात घुसले पाचशे कोटीच्या वर शेती रस्त्याची वित्तहानी,...

आभाळ फाटले, गुलाबचे काटे अंगात घुसले पाचशे कोटीच्या वर शेती रस्त्याची वित्तहानी, मुख्यमंत्र्यांसोबत मराठवाड्यातील जिल्हाधिकार्‍यांची आज दुपारी महत्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सबीड जिल्ह्याने तयार केला शेतकर्‍यांच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ५ लाख २४ हजार २१२ हेक्टरची शेती उद्ध्वस्त
लाख ६५ हजार ९१० शेतकर्‍यांच्या अंगात गुलाबचे काटे, अडीचशे कोटींची शेतकर्‍यांना मदत लागणार

बीड (रिपोर्टर)- गुलाब चक्री वादळाने निर्माण केलेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्याने मराठवाड्याला अक्षरश: उद्ध्वस्त केलं. मुसळधार पावसाने सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कित्येक पटीने पाऊस जास्त झाल्याने शेती, रस्ते, पुल, पशुधन, घरांच्या पडझडीतून मराठवाड्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या या मुसळधार पावसाने उडवल्या. गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात झालेल्या धुव्वाधार पावसाने जिल्ह्यात ५०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची वित्त हानी झाली. ५ लाख २४ हजार २१२ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली. ६ लाख ६५ हजार ९१० शेतकर्‍यांच्या शेतातले पीक अक्षरश: पाण्यात गेले. सदरची आकडेवारी पाहितल्यानंतर मुसळधार पावसाच्या हाहाकाराची तीव्रता दिसून येते. बीड जिल्ह्यात अनेक रस्ते उखडले गेले, पुलं वाहून गेले, घरांची पडझड झाली. पशूधन मृत्यूमुखी पडले. काही लोकांचे मृत्यू झाले. अशा स्थितीत आज केवळ शेतकर्‍यांना सर्वात आधी प्राधान्य देत बीड जिल्हा प्रशासनाने फक्त शेतकर्‍यांसाठी अडीचशे कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला असून आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मरांवाड्यातील जिल्हाधिकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बीड जिल्ह्याच्या हाहाकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. अपेक्षा एवढीच, मुख्यमंत्र्यांनी यापुढे बैठकीचा फार्स न ठेवता शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी.


गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसह रस्ते, घरांच्या पडझडी, पुलं वाहून गेली आदींचे संयुक्त पंचनामे महसूल आणि कृषी विभागामार्फत युद्ध पातळीवर तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत. २३ सप्टेंबरपर्यंत बीड जिल्ह्यात झोल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. २३ तारखेनंतर जी अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे युद्ध पातळीवर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आपल्या महसूल यंत्रणेसह कृषी विभागाला दिलेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये राज्य रस्त्यावरील ५ पुल पुर्णत: वाहून गेले आहे तर शासकीय इमारतीपैकी एक इमारत पुर्णत: पडली आहे तर अनेक घरांचीही पडझड बीड जिल्ह्यात झाली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे याचे स्वतंत्र अहवाल कृषी आणि पशूसंवर्धन विभागाला तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिलेले आहेत. आजपर्यंत महसूल प्रशासनाने कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबरपर्यंत बीड जिल्ह्यातील ६ लाख ६५ हजार ९१० शेतकर्‍यांना या अतिवृष्टीची झळ पोहचली असून त्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतर पिके पुर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. तर ५ लाख २४ हजार २१२ हेक्टरवरील पिके आणि शेतातील काळी माती खरडून गेली आहे. यामध्ये वाण नदी, गोदावरी सिंदफणा या नदी काठांच्या गावातील शेतकर्‍यांचा समावेश आहे. आज जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निकषानुसार शेतकर्‍यांना मदतीसाठी अंदाजे जवळपास २५० कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी लागतील, असा हा अहवाल तयार असून याबाबत मराठवाड्यातील शेतकर्‍यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री संयुक्तरित्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी आणि अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. बीड जिल्ह्याचाही नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी शर्मा हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!