Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजयंत पाटील, धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक...

जयंत पाटील, धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी पुरग्रस्तांच्या मदतकार्याचा आढावा

कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचाही आढावा!
२ जिल्ह्याचा दौरा, कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी देत त्यांनाही दिले बळ
बीड (रिपोर्टर)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान सर्वांनाच या दोघांच्या कामांचा सपाटा पाहायला मिळाला. दोनही मंत्री महोदयांचा आज सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस पहाटे तीनला संपला!
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उभय मंत्री महोदयांनी चक्क रात्री १०.३० वा. जलसंपदा विभागाची बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यांसह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोक-प्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.

तिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी व आढावा
बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. मंत्री जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तर धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात सुरू मदत कार्याचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेतला व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

Most Popular

error: Content is protected !!