Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमपिंपळनेरमध्ये शरद पवारांचं माळवद कोसळलं

पिंपळनेरमध्ये शरद पवारांचं माळवद कोसळलं

सुदैवाने जिवीत हानी टळली, दोन परिवार बेघर
पिंपळनेर (रिपोर्टर)- गेल्या पंधरवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड होत आहे. आज सकाळी शरद भारत पवार व शंकर पवार या दोघांची असलेली भिंत आणि शरद पवार यांचे माळवद अचानक कोसळले. दोन्ही कुटुंबामध्ये लहान मुलांसह मोठा परिवार आहे. मात्र जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा घरात कोणीच नव्हते. त्यामुळे सुदैवाने जिवीत हानी टळली. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही परिवार बेघर झाले आहेत.


आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पिंपळनेर येथील दत्त मंदिर गल्लीत राहणारे शरद भारत पवार व शंकर पवार यांच्या घराच्या भिंतीसह शरद पवार यांचे माळवद अचानक कोसळले. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. दोन्ही कुटुंबामध्ये लहान मुलांचा मोठा परिवार आहे मात्र आज सकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा घरामध्ये कोणीच नव्हते. त्यामुळे सुदैवाने जिवीत हानी टळली. शरद पवार यांचे मालवद कोसळल्याने ते बेघर झाले आहेत तर त्यांच्या शेजारी असलेले शंकर पवार यांचीही या माळवदाबरोबर भिंत कोसळल्याने तेही उघड्यावर आले आहेत. दोन्ही परिवाराला तात्काळ मदतीची गरज असून सुतारकीची कारागिरी करून उदरनिर्वाह करणार्‍या या कुटुंबाला तात्काळ शासन-प्रशासनाने मदत देऊन त्यांचे घर पुन्हा उभारावे यासाठी घरकुलातून या दोन्ही कुटुंबांना निवारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!