Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमकुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला


गेवराई (रिपोर्टर)- बीड-औरंगाबाद महामार्गावरील रांजणी गावच्या सर्व्हीस रोडलगत एका नाल्यात कापडात गुंडाळलेल्या महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अंदाजे ३५ वर्षे वयाची ही महिला कोण? तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत याठिकाणी कोणी टाकला? तिची हत्या कोणी केली? यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून घटनास्थळी पोलीस डेरेदाखल झाली आहे. सदरील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटना-स्थळावरच शवविच्छेदन करण्याच्या हालचाली सुरू असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

बीड-औरंगाबाद महामार्गावरील रांजणी गावच्या सर्व्हीस रोडलगत एक नाला आहे. या ठिकाणावरूएन दुर्गंधी येत असल्याने रांजणी गावच्या नागरिकांनी काल गेवराई पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी काल घटनास्थळी येऊन पाहणी केली. महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि तो कापडात गुंडाळलेला दिसून आला. मात्र काल पोलिसांनी कुठलीही तत्परता दाखविली नाही. आज सकाळी पोलीस घटनास्थळी आले. मृतदेह अत्यंत कुजलेला आणि केवळ हाडाचा सापडाच गुंडाळलेल्या कपड्यात असल्याने स्पॉट पंचनाम्यासह शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांनाही घटनास्थळी बोलवण्यात येत आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा? या महिलेची हत्या कोणी केली? यासह अन्य प्रश्‍न उपस्थित होत असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!