Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडअनाधिकृत बायो डिझेलचा पंप सील हिंगणी फाटा येथे सुरू होता अनाधिकृत पंप

अनाधिकृत बायो डिझेलचा पंप सील हिंगणी फाटा येथे सुरू होता अनाधिकृत पंप


बीड (रिपोर्टर)बीड जिल्ह्यात परवाना नसताना बायो डिझेलचे सर्रास अवैध पेट्रोल पंप उभारत बायो डिझेलची विक्री केली जात असल्याची तक्रार पेट्रोलिंग कंपनीच्या अधिकृत पेट्रोल पंप धारकांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्यानंतर पेट्रोलिंग कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या पथकाने हिंगणी फाटा येथील बायो डिझेलच्या पंपावर छापा मारून तो सील केला. यामुळे जिल्ह्यातले अन्य बायो डिझेल विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक असे की, सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, अशा परिस्थितीत बायो डिझेल हे प्रतिलिटर 10 ते 20 रुपयांनी कमी मिळत असल्याने वाहन चालक बायो डिझेलकडे वळले आहेत. तीच संधी पाहत माफियांनी जिल्ह्यात परवानगी नसताना बायो डिझेल विक्रीला सुरुवात केली. या आधी रिपोर्टरने जिल्ह्यातील बायो डिझेल प्रकरण उजेडात आणले होते. त्यावेळी टँकरमधून बायो डिझेलची बेकायदेशीर विक्री केली जात होती, परंतु आता तर बायो डिझेलचे थेट पंपच उभारल्याचे समोर येते. अन्य राज्यात बायो डिझेलला परवानगी असली तरी आपल्याकडे ती अद्याप नाही. याची तक्रार पेट्रोलियम कंपनीच्या अधिकृत पेट्रोल पंप धारकांनी केल्यानंतर आज उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या पथकाने धुळे-सोलापूर रोडवर असलेल्या हिंगणी फाटा येथे बायोडिझेलच्या पंपावर छापा मारला. घटना स्थळावरून बायो डिजेल विकणारे पसार झाले. हा डिझेल पंप ज्यांच्या जमिनीत आहे त्यांचे नाव आब्बड असल्याचे सांगण्यात येते. ही कारवाई आज सकाळी टिळेकर यांच्यासह तहसीलदार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलियम कंपनीचे मॅनेजर, तहसीलदार राऊत, एपीआय उबाळे, मंडळ अधिकारी नितीन जाधव, मंडल अधिकारी सचीन सानप, तलाठी पठाण, डोळसे, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय उबाळे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!