Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमअज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू गढी-माजलगाव रोडवर घडली पहाटे घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू गढी-माजलगाव रोडवर घडली पहाटे घटना


गेवराई (रिपोर्टर):- अज्ञात वाहनाच्या धडकेने एका 30 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहाच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवर असलेल्या टाकळीतांडा येथे घडली. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस घटनास्थळी डेरेदाखल झाले. या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव अशोक सखाराम माने रा.सेलू ता.गेवराई असे आहे.

अशोक माने हा तरूण गढी-माजागव महामार्गावर टाकळीतांडा या ठिकाणी पायी चालत असतांना त्याला भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये तरूण जागीच ठार झाला. सदरची घटना आज पहाटे 6 वाजता ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यानूसार पोलीसांना माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पोलीस काँ.राऊत यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयामध्ये नेला. या प्रकरणात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!