Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीदहा एकर ऊसाच्या शेतावर महावितरणाची ठिणगी ऊस जळून खाक, काडीवडगांव येथे

दहा एकर ऊसाच्या शेतावर महावितरणाची ठिणगी ऊस जळून खाक, काडीवडगांव येथे


आज घडली घटना, शेतकर्‍यांवर आर्थिक संकट
वडवणी (रिपोर्टर):- शेतकऱ्यांच्या दहा एकर प्लॉटवर असलेल्या ऊसाच्या पिकावर महावितरणाची थिनगी पडली असून यात ऊस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली असल्याची माहिती मिळाली असून हि घटना वडवणी तालुक्यातील मौजे काडीवडगांव येथे घडली असून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

वडवणी तालुक्यातील मौजे काडीवडगाव येथील शेतकरी रामेश्वर आच्युतराव बादाडे,एकनाथ शेषराव बादाडे,महारुद्र दत्तात्रय राऊत या तीन शेतर्‍याचा एकुण यांचे दहा एकर शेत आहे. या शेतात यंदा ऊसाची लागवड होती. या शेतकर्‍यांच्या शेतातुन महावितरणच्या विद्युत वाहिनी गेलेली आहे यात आज सकाळी 11 वा. सदरील महावितरण तार तुटून शाँटसर्कट झाले आणि त्याची थिनगी ऊसाच्या फडात पडली आणि यात ऊस जळून खाक झाला आहे.यामुळे शेतकर्‍याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. डोळ्या देखत आपल्या स्वप्नाचा चुराडा होत असताना शेतकरी मात्र हतबल झाले आहे. दरम्यान या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी,अशी मागणी होत आहे. तर या घटनेमध्ये कोणतेही जिवितहानी झालेली नाही.

Most Popular

error: Content is protected !!