Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडतोतया कर्मचार्‍याकडून वीज ग्राहकांची फसवणूक

तोतया कर्मचार्‍याकडून वीज ग्राहकांची फसवणूक


बीड (रिपोर्टर)- मी महावितरणचा कर्मचारी आहे, आपले मिटर खराब झाले आहे, ते नवे देतो, असे म्हणून ग्राहकाचे मिटर घेऊन पैसे उकळले तर एकाचे कागदपत्र घेऊन त्याला तेच मिटर बसवून दिले. या प्रकरणी सहायक अभियंता यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बिभिशन भोसले (रा. बीड) याने मी महावितरणचा कर्मचारी आहे, असे म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाला तुमचे मिटर खराब झाले आहे, ते मी बदलून देतो, असे म्हणून त्याचे मिटर काढून घेतले व त्याच्याकडून पैसेही घेतले तोच मिटर नगर रोड येथील पीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथील एकाला बसून त्याच्याकडून पैसे उकळले. हा प्रकार सहायक अभियंता प्रदीप मिसाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून तोतया कर्मचारी बिभिशन भोसले याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीसात तक्रार दिली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नाईक अवसरमल हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!