Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडमुंडे, क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची मोट बांधू

मुंडे, क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची मोट बांधू


केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरू -सचिन जाधव

बीड (रिपोर्टर):-

केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही धोरणाविरोधात शहरासह जिल्ह्यातल्या तरूणांना जागृत करून हुकुमशाही विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरण्याचे धोरण आखणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागळातल्या युवका-युवकात निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगून गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी विरोधात यापुढेही आक्रमक आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने काल राज्यभरात तिव्र आंदोलने करण्यात आली. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही धोरणाविरोधात आता शहरातलाच नव्हे तर ग्रामीण भागातला युवकही पेटून उठला पाहिजे. सत्य आणि असत्यामधील फरक त्याला समजला पाहिजे. हुकुमशाही आणि धर्मांधतेच्या जोरावर युवकांच्या विचाराचे विकेंद्रीकरण करणार्‍या मोदी सरकार विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणार अस सांगून सचिन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांची विचारधारेची आजच्या तरूणांना नितांत गरज आहे. त्यामुळे तरूणांमध्ये राष्ट्रवादीचे


विचार जास्तीत जास्त पोहचण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत असे ही पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ विरोधातील आंदोलनावेळी सचिन जाधव यांनी म्हटले. बीड शहरात आणि जिल्ह्यातील युवकांना राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित आणण्यासाठी आता झपाटून काम तुम्ही, आम्ही सर्व मिळून करू त्याचबरोबर केंद्र सरकार ज्या पद्धतीने बोलते एक आणि करते एक ही वस्तुस्थिती युवकांसमोर आणून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत जाणारी बेरोजगारी, वाढती महागाई आणि समाजात येणारी अस्थिरता ही आजच्या पिढीचे भविष्य उद्धवस्त करणारी आहे. त्यामुळे युवकात जागृती निर्माण करणे हाच युवक काँग्रेसचा प्रयत्न असून हे सर्व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आ.संदिप क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, प्रदेश सचिव के.के.वडमारे, जयसिंह सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करू असे सचिन जाधव यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादी युवती बीड जिल्हाध्यक्षा सौ.विद्याताई जाधव, नंदकुमार कुटे, वाजेद शेख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!