Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांच्या प्रश्‍नी रिपाइं आक्रमक, आंधळं दळतय अन् कुत्रं पिठ खातय, ओला दुष्काळ...

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी रिपाइं आक्रमक, आंधळं दळतय अन् कुत्रं पिठ खातय, ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50 हजार रुपये द्या, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने


बीड (रिपोर्टर)- अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत जाहीर केली. शासनाने शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये घोषीत करावेत, त्याचबरोबर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा यासह इतर मागण्यांसाठी आज रिपाइं आक्रमक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. शासन शेतकरी, आरक्षण प्रश्‍नी दुर्लक्ष करत असून शासनाचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतय अन् कुत्रं पिठ खातय’, असा असल्याचे प्रतिकात्मक आंदोलनातून दाखवण्यात आले आहे.
20 दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. हाता-तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत देण्याऐवजी तुटपुंजी मदत दिली. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांची मदत द्यावी, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात यावा, ओबीसी आरक्षण देण्यात यावे, दलित, बौद्ध, मागासवर्गीय गोरगरिबांना मागणी करताच घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतच्या ठरावाची अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. शासनाच्या निषेधार्थ म्हणून ‘आंधळं दळतय अन् कुत्रं पिठ खातय’, या आशयाचे प्रतिकात्मक तयार करण्यात आले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!