Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडअनिल देशमुखांना अटक १०० कोटींची वसुली

अनिल देशमुखांना अटक १०० कोटींची वसुली


मुंबई (रिपोर्टर)- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अखेर सोमवारी रात्री उशिरा सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर १२ तास त्यांची चौकशी सुरू होती. रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ७१ वर्षीय देशमुख यांच्यावर पैशांची अफरातफर (पीएमएलए) तसेच मुंबईतील बार आणि हुक्का पार्लर मालकांकडून दरमहा १०० कोटींची वसुली तसेच पोलिस बदल्यांमधील गैरव्यवहार असे आरोप आहेत.

Most Popular

error: Content is protected !!