Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeराजकारणदेगलूरमध्ये कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयाच्या मार्गावर, दादरा नगर हवेलीत शिवसेना ऐतिहासिक विजयाच्या...

देगलूरमध्ये कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयाच्या मार्गावर, दादरा नगर हवेलीत शिवसेना ऐतिहासिक विजयाच्या दिशेने


नांदेड (रिपोर्टर)- बहुचर्चित नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी आज होत असून सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच भाजपा उमेदवार सुभाष साबणे पिछाडीवर असल्याने दहाव्या फेरीअखेर कॉंग्रेसचे जितेश अंतापुरकर हे तब्बल १० हजार ९६९ मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपाच्या तोंडाा फेस आल्याचे दिसून येते. कॉंग्रेस या ठिकाणी विजयी घोडदौड करताना दिसून येत आहे तर तिकडे दादर नगर हवेली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. यासोबतच दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघाची देखील मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदार संघातील पोट निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून देगलूर येथील १० फेरींची मतमोजणी पूर्ण झाली आहे. देगलूरमध्ये १४ टेबलवर ३० फेर्‍यांची मतमोजणी होत आहे.


देगलूरमध्ये पहिल्या फेरीअखेर कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत. त्यांना ४२१६ मतं मिळाली आहेत. तर, भाजपाचे सुभाष साबणे २५९३ मतांसह दुसर्‍या क्रमांकावर असून वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले तिसर्‍या क्रमांकावर असून त्यांना ३२० मतं मिळाली आहेत. कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर १६२४ मतांनी आघाडीवर आहेत. दुसर्‍या फेरीच्या मतमोजणी अंती कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर ७२९४ मते मिळाली आहेत, तर भाजपाच्या सुभाष साबणे यांना ५००१ मतं मिळाली आहेत. दुसर्‍या फेरीअंती अंतापूरकर २२९३ मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीअखेर कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर १८२४७ मतांसह आघाडीवर आहेत. तर,भाजपाचे सुभाष साबणे १२०७७ मतांसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. जितेश अंतापूरकर सध्या ६१७० मतांनी आघाडीवर आहेत. सातव्या फेरीअंती कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर २५३७६ मतांसह आघाडीवर आहेत. तर, भाजपाचे सुभाष साबणे १७१६४ मतांसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले २२८७ मतांसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. कॉंग्रेसचे अंतापूरकर ८२१२ मतांनी आघाडीवर आहेत. १०व्या फेरीच्या मतमोजणी अंती कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर ३६५९२ मतांसह आघाडीवर आहेत. तर, भाजपाचे सुभाष साबणे २५६२३ मतांसह दुसर्‍या क्रमांकावर आणि वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले ३५६० मतांसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. कॉंग्रेसचे अंतापूरकर १०९६९ मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून इथे शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आघाडीवर आहेत. कलाबेन डेलकर यांच्याविरोधात भाजपाने महेश गावित यांना उमेदवारी दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!