Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांची दिवाळी प्रशासनाच्या दारात आंदोलनकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शेतकर्‍यांची दिवाळी प्रशासनाच्या दारात आंदोलनकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


बीड (रिपोर्टर):- २०२० साली बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना विमा कंपनीने विमा वाटप केला नसल्याने यासाठी किसान सभेने संघर्ष दिंडी काढली. ही दिंडी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. शेतकरी रात्रभर रस्त्यावरच थांबलेले होते. सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. या सणात शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे. शेतकर्‍यांची दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात असून आज ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनात शेकडो शेतकर्‍यांचा सहभाग आहे. अनेकांनी या आंदोलनाला आपले समर्थन दिले आहे.


बीड जिल्ह्यामध्ये २०२० साली ४ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता. यावर्षी शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. नुकसान होवूनही शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. विमा कंपनीने शेतकर्‍यांना विमा वाटप करावा यासह इतर प्रमुख मागण्या घेवून किसान सभेने परळी तालुक्यातून संघर्ष दिंडी काढली होती. ही दिंडी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. शेतकर्‍यांनी रात्रभर रस्त्यावर जागून काढली. आजही शेतकर्‍यांचे कलेक्टर कचेरीसमोर ठिय्या आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत विम्याचा प्रश्‍न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. सध्या दिवाळीचा सण सुरू असून या सणासुदीतही शेतकर्‍यांचे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अनेकांनी आपला पठिंबा दर्शवलेला आहे. आंदोलनात शेकडो शेतकर्‍यांचा सहभाग आहे.

शहिद शेतकर्‍यांची कलश यात्रा बीडमध्ये
उत्तर प्रदेशच्या लखीम खेरी येथील शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून चार शेतकर्‍यांना ठार करण्यात आले आहे. या शेतकर्‍यांची कलश यात्रा बीडमध्ये आलेली आहे. सदरील कलश जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी ठेवण्यात आले होते. यावेळी शेतकर्‍यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!