मुंबई (रिपोर्टर) बंडखोर आमदारांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नांची परिकाष्टा करताना दिसून येत आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या चाळीस शिवसेना आमदारांच्या पीएसह सीक्युरिटी गार्डसह कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे बंडखोर आमदारांना अपात्र करण्याइरादे कायदेशीर प्रक्रिया तपासण्यात येत आहेत. दुसरीकडे विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनिल प्रभू यांच्या निवडीला विधीमंडळाने मान्यता दिली आहे. तिसरीकडे सरकार वाचवण्यासाठी आज पून्हा आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
बंडखोर आमदारांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नांची परिकाष्टा करताना दिसून येत आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या चाळीस शिवसेना आमदारांच्या पीएसह सीक्युरिटी गार्डसह कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे बंडखोर आमदारांना अपात्र करण्याइरादे कायदेशीर प्रक्रिया तपासण्यात येत आहेत. दुसरीकडे विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनिल प्रभू यांच्या निवडीला विधीमंडळाने मान्यता दिली आहे. तिसरीकडे सरकार वाचवण्यासाठी आज पून्हा आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
लोकशाहीत नंबर
महत्वाचे-एकनाथ शिंदे
लोकशाहीमध्ये आकडे महत्वाचे असल्याचे सांगत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे संख्याबळ आहे. अद्याप आम्हाला सरकार स्थापनेचा दावा करायचा की नाही हे आमच्यासोबत असलेल्या आमदारांच्या बैठकीनंतर सांगेल. परंतू केवळ बैठकीला गैरहजर राहिले म्हणून अपात्रतेची कारवाई करणे चुकीचे आहे. येणार्या काळात सर्व काही दिसून येईल. अपात्रतेच्या कारवाईबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
शिंदे गटाला मोठा धक्का
अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, कोर्टात धाव घेणार?
बंड केल्यानंतर शिवसेनेनं कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळानं मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिल्याचंही सूत्रांनी यावेळी सांगितलं.
बंडखोर आमदारांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई!
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. मात्र याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या झडज अर्थात पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.