Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडएस.टी.आगाराकडे चोरट्यांचं लक्ष, एसटीसह आगारातून अनेक वस्तूंची चोरी, गुन्ह्याचा तपास मात्र सुट्टीवर...

एस.टी.आगाराकडे चोरट्यांचं लक्ष, एसटीसह आगारातून अनेक वस्तूंची चोरी, गुन्ह्याचा तपास मात्र सुट्टीवर गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याकडे


बीड (रिपोर्टर)ः- एस.टी. महामंडळास राज्य शासनास विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एकीकडे संप करत असतांना एकही बस बसस्थानकाबाहेर जात नसतांना आता चोरट्यांनी आपलं लक्ष बसस्थानकाकडं वळवलं असून बीड बसस्थानाकातून कित्येक बसमधून वेगवेगळे साहित्य चोरीस गेल्याचे उघडकीस येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आंदोलन स्थळी आंदोलकासाठी पोलीस असतांना चोरटे चोरी करण्यात यशस्वी ठरतात. काल मात्र एस.टी च्या कार्यशाळा आगारात चोरी करतांना एक जणास पकडण्यात आले तर दुसरा फरार झाला. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास मात्र सुट्टीवर गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याकडे दिल्याने राज्य सरकार जसे आंदोलनाकडे दुर्लक्ष करते तसे बीड पोलीस एस.टी.आगाराच्या चोरी प्रकरणाकडे दुर्लक्ष करते काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गेल्या अकरा दिवसापासून एस.टी. कामगार आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत असल्याने बीड बसस्थानकातील सर्व कामकाज ठप्प आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूस आंदोलनकर्ते बसलेले आहे. याच जवळ कार्यशाळा असून या कार्यशाळेतील व्हील डिस्क, रिंग लूज स्प्रींग, पाटे, चेसीस, लोकेटर (घोडी) चोरून घेवून जात असतांना लखन नाक एका चोरट्याला ताब्यात घेण्यात आले तर एक अनोळखी चोरटा फरार झाला. आंदोलन दरम्यान उभ्या असलेल्या बस मध्येही हात साफ करुन अनेक साहित्य लंपास केले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात सुहास दिलीप कोळपकर सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतर हा तपास सुट्टीवर असलेल्या कर्मचार्‍यावर देवून पोलीस मोकळे झाले. शिवाजी नगर हद्दीत रोज मोठ्या प्रमाणात घटना घडत असून पोलीस अशाच पध्दतीने तपास करत असतील तर चोरट्याने मुद्देमालाची विल्लेवाट लावल्यानंतर पोलीस चौकशी सुरू करणार का? अशा कारणामुळे चोरीच्या घटना उघडकीस कशा होणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!